💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एकाच आयुष्याची "सेकंड इंनिंग" म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही त्याच्या त्या अनुभवाची व एकंदरच कार्यक्षमतेची त्या व्यक्तीच्या कुटुंबाला गरज. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहे.परंतु हा एक अपरिहार्य दिवस असतो. काही जण म्हणतात की माणसाने तेव्हाच निवृत्त व्हावे जेव्हा वरचाचे बोलावणे येईल खरे आहे काम तर शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागते परंतु कोणत्या कामात कुठे थांबावे हे महत्वाचे नाही का? योग्य वेळी थांबणे हे सुद्धा एक कौशल्यचं आहे ते सर्वांना जमेलच असे नाही.
आजच्या जीवनात पैसे कमविणे सोपा आहे माणसं कमविणे कठीण आहे. मोजके उदाहरण सोडले तर कुणाला सहसा हे सुख लाभत नाही. या जगात कोण कोणाला ऐकत. या जगात सर्वात कठीण काही असेल तर ते कोणाला ऐकणे. शिक्षक मात्र याला अपवाद.
आज दिनांक 31 मे 2025 रोजी वडील, श्री. श्रीराम राजधर पाटील हे शिक्षण क्षेत्रातून 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपशिक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. माध्यमिक शिक्षक म्हणुन त्यांनी 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात अविरत सेवा दिली.
आज त्यांच्या या कारकिर्द बद्दल मनापासून लिहावे असे वाटत आहे. या लेखणी मागे त्यांची शिक्षक म्हणून पार पाडलेली एक भूमिकेचा भाग या पत्राद्वारे मांडत आहे.
12 जून 1993 साली वडिलांनी उपशिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं. B.Sc - B.Ed ही त्यांची शैक्षणिक पदवी. विज्ञान व गणित हे त्यांचे शिकवण्याचे विषय. ज्या वेळी या क्षेत्रात पदार्पण केल त्यावेळी या क्षेत्राचा उतरता काळ सुरू होता. सुरवातीचे दिवस हे खूप हाल अपेष्टातून गेले. मूळगाव मूडी तालुका. अमळनेर ते कर्मभूमी तावखेडा प्र. बे. तालुका. शिंदखेडा हा सुरवातीचा प्रवास रोजचा असायचा. मूडी ते बेटावद व वर्षी ते दभाषी रोज पायपीट तिथून पुढे काही वाहन भेटला तर त्याने शाळा गाठायची हा नित्यक्रम. आठवड्यातून 3-4 दिवस तावखेडा येते मुक्काम असायचा व वीकेंड ला घरचा रस्ता. सुरवातीचे सुमारे 14 वर्ष (1993-2007) खूप जिकिरीची होती. 14 वर्ष विनापगारी वडिलांनी शाळेला सेवा दिली. संयम काय असतो हे यातून शिकण्याजोगे आहे असे मला नेहमी वाटते. पुढे याच काळात 3 वर्ष न्यायालयीन लढा लढला व जिंकला. आणि या सर्व संघर्षातून वाट काढत एक यशस्वी जीवनाचा आदर्श आम्हसर्व समोर उभा केला.
या प्रवासात अगणित अडचणी आल्या त्या व्यक्तिगत वा व्यवहारिक या रूपात. एका शिक्षकाचे जीवन हे सोपे कदापि नसते. कुठेतरी वाचनात आले होते, शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो. या प्रवासात अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावत एक यशस्वी शिक्षकाचे आयुष्य पूर्णत्वास त्यांनी नेले. या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूक ड्यूटी, दहावी बोर्ड परीक्षा मंडळ, अभ्यासमंडळ इत्यादी हे कामी ही आवडणीने पार पाडली. या प्रवासात ज्या अडचणी त्यांनी अनुभवल्या त्या मला शब्दात मांडता येण्या इतपत सोप्या नक्कीच नाहीत, त्या आम्ही आणि त्यांचा सोबत असणारे व त्यांना ओळखणारे लोक यांनी अनुभवले आहेत. या सर्व प्रवासात त्यांना खूप मोलाची अशी पाऊलोपावली कोणाची साथ लाभली असेल तर पत्नी सौ. वैशाली श्रीराम पाटील यांची. ज्या संस्थेत आणि ज्या शाळेला, व गावावर अविरत सेवा केली त्यांनाही भरभरून दिले.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात आपण देखील काम करून पहावे व त्याबद्दल अनुभव घ्यावा असे माझे प्रांजळ मत आणि मी ते सिनिअर कॉलेजला Lecturer म्हणून अनुभवून बघितले. उपशिक्षक या पदावर काम करत असताना अनेक कडू-गोड प्रसंगाना ते सामोरे गेले. उमेदीच्या काळात त्यांनी जीव ओतून काम केलं. पडतीच्या काळात धीर धरून मोर्चा सांभाळला आणि आज यशस्वी रित्या सेवा पूर्ण केली.
या 32 वर्ष सेवेच्या काळात मला त्यांची कुठली एक गोष्ट कायम स्मरणात राहील ती अशी की, शेतीसाठी त्यांची आवड कधीही कमी झाली नाही. स्वतः शेती करणे आणि आवडीने करणे हा कार्यक्रम. या बद्दल देखील खूप काही आठवणी आहेत. शाळा आणि शेती हा नित्यक्रम नियमित आजगायत त्यांनी सुरू ठेवला आहे. निवृत्ती नंतर अजून आवडीने शेती कडे वळणे हा पर्याय त्यांनी आवर्जून पुढे ठेवला आहे. त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कधीच
या 32 वर्षाचा कार्यकिर्दीत त्यांनी केली अनेक चढउतार पाहिले महत्वाचं म्हणजे खुप चांगली माणसं जोडली. आज का कुणास ठाऊक, त्यांच्याबद्दल लिहताना अंतःकरण जड झालंय. कारण, रोज ठरलेली दिनचर्या उद्यापासून पूर्णविराम घेणार आहे. त्यांचा जीवनपट व कार्यपट त्यांच्यापेक्षा अधिक तळमळतेने कोणीही मांडू शकत नाही. या लेखणीतून मी छोटा प्रयत्न करून त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल त्यांचे मनस्वी आभार करतो व पुढील आयुष्य सुदृढ, निरोगी आणि आनंददायी जावो यासाठी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
.. आपलाच..
गौरव श्रीराम पाटील ✍🏽

Comments
Post a Comment