💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 एकाच आयुष्याची "सेकंड इंनिंग" म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही त्याच्या त्या अनुभवाची व एकंदरच कार्यक्षमतेची त्या व्यक्तीच्या कुटुंबाला गरज. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहे.परंतु हा एक अपरिहार्य दिवस असतो. काही जण म्हणतात की माणसाने तेव्हाच निवृत्त व्हावे जेव्हा वरचाचे बोलावणे येईल खरे आहे काम तर शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागते परंतु कोणत्या कामात कुठे थांबावे हे महत्वाचे नाही का? योग्य वेळी थांबणे हे सुद्धा एक कौशल्यचं आहे ते सर्वांना जमेलच असे नाही. आजच्या जीवनात पैसे कमविणे सोपा आहे माणसं कमविणे कठीण आहे. मोजके उदाहरण सोडले तर कुणाला सहसा हे सुख लाभत नाही. या जगात कोण कोणाला ऐकत. या जगात सर्वात कठीण काही असेल तर ते कोणाला ऐकणे. शिक्षक मात्र याला अपवाद. आज दिनांक 31 मे 2025 रोजी वडील, श्री. श्रीराम राजधर पाटील हे शिक्षण क्षेत्रातून 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपशिक्षक या पदा...