Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

मतलबी✍️

 लोग भूल जाते है नाम....जब निकल जाता है काम..... “कामा पुरता मामा , ताकापुरती आजी, जोवर पुरती हट्ट सर्व हे पत्नी असे राजी.” लहानपणी एकलेल्या ह्या ओळी आजच्या काळाचे वर्णन खूप योग्य आणि अचुक करताय. असे म्हणतात गरज ही काळाची जननी आहे, पण प्रत्यक्षात गरज फक्त क्षणिक मतलब आहे. मतलब जिथपर्यंत ओळख तिथपर्यंत. ह्या आभासी जगात सर्व काही ही गरजे पूर्त मर्यादित आहे इथर्यंत वाटायला लागतय.  आपण सारेच मतलबी बरं का? सारेच.. बालपणी शाळेत जायला सोबत होईल म्हणून कोणाशी तरी दोस्ती करणार, मग गृहपाठ सहज पुर्ण होईल म्हणून मैत्री करणार, खाऊला पैसे मिळनार म्हणून पाहुण्यांच्या पाया पडनार लहानपासुन आपणच आपल्यावर  मतलबीपणाचा मुलामा चढवत राहिलो. ती छान फ़ोटो काढते, ती सुंदर दिसते, तिच्यासोबत राहिल तर notes मिळायला बर होईल. तीचे Practical Records पुर्ण असतात म्हणून तिच्या मागे मागे फिरणारया कितीतरी असतात. तो चित्र फार सुंदर काढतो त्याच्यासोबत राहिलो तर आपल पण काम जमतंय, असे असंख्य मतलब-गरजा वेगवेगळ्या नात्यांच्या लेबलखाली आपल्या सभोवताली बघायला मिळतात. एखादया व्यक्तीला आपण ह्या अश्या फसव्या दुनियेतसुद्...