Skip to main content

रूम, मी आणि पसारा

 गेल्या कोरोनाच्या पिरियड मधे बरीच काम झालीत. इतक्या वर्षांपासून कधीच एवढा फावला वेळ मिळालाच नाही असे नाही,पण नेहमीप्रमाणे आळस जास्त तो आजही कायम आणि टापटीपपणा कमी होता. 

आज खूप महिन्यानंतर नव्हे वर्षानंतर माझा पसारा आवरायला घेतला. 12वी, डिग्री झाली की सगळा पसारा फक्त पोत्यामधे घालुन ठेवण्यात आला होता. आणि त्यात भर म्हणून आताचा पद्वित्युर हा बाकीचं. गेल्या काही वर्षांपासून असलेली पुस्तके, नोट्स, स्वलिखिते, झेरॉक्स, वह्या जे उगाच सांभाळून ठेवलंय ते बाजूला करून रूम बाहेर काढावे म्हटले.सुरुवात केली, दुपारपासून इकडचे तिकडे नि इकडचे इकडे करतोय, बघतोय नि बाजूला करतोय. दमछाक होतेय. यातच कित्येक जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

प्रत्येक नोट्स, झेरॉक्स, यावरील लिहलेले quotes, शायरी इत्यादी बगताना खूप भारी वाटतंय. मी स्वतःहून एवढ्या वर्षात एवढे सगळे वाचले नोट्स काडल्या होते यावर माझाच विश्वास बसत नाहीये. स्वतः काढलेल्या हस्तलिखित नोट्स, वह्या ज्या आता मलाही वाचता येईनात तर तीन पोते भरतील एवढ्या सापडल्या. जुन्या रूमवरील हा सामान रूम सोडताना रद्दिवाल्याला न देता तसाच दुसऱ्या ठिकाणी घेऊन आलो त्यामागेही एक वेगळंच सौख्य होत, हे सगळे एम.फॉर्म. पूर्ण करे पर्यंत गोळा केलेल आहे. 

Finally I found it !

एक बाजूने प्रॅक्टिकली विचार केला तर या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात पुन्हा कधीही वाचणार नाहीये हे मला ही चांगला ठाऊक आहे, तरीही इतके वर्ष मी हा पसारा का सांभाळत आहे हे मला कळत नाहीये मग डिस्पोस ऑफ करायला काय हरकत आहे?आणि खरेच हे सगळे बाजूला केल्यानंतर रूम कसा सुटसुटीत नि प्रसन्न वाटेल यात शंका नाही आहे.


यातच अचानक डोक्यात विचार आला की आपल्या मनाचे पण असेच काही झालेय का? कित्येक वर्षांपासूनच्या किती तरी अप्रिय आठवणींची जळमटे, विचारांचा गुंता, त्रासदायक घटना, मानसिक आघात, कुणाबद्दल तरी असलेला निरर्थक आकस, अनुत्तरीत प्रश्न, भविष्याचा वेध, इतराबद्दल असलेलं वाईट मत इत्यादी,...गोष्टी मनात आणि ह्रुदयात पसारा करून आहेत. 


मग ते देखील साफ करायलाच हवे…कारण या सर्वांचा मला वर्तमानात सकारात्मक असा काहीही उपयोग होत नाहीये. झाला तर त्रासच होतो आणि दरवेळी नव्याने अधिक तीव्रतेने होत राहतो. आणि याचा भविष्यातदेखील खरच काही उपयोग होईल की नाही सांगणे अवघड आहे.


पसा-यात काही दुर्मीळ , विलक्षण आणि कायम स्वरुपी जपून ठेवणाऱ्या आठवणी सुद्धा असतात, हे मात्र विसरायचं नसत.

आधी मनातला पसारा आवरणे महत्वाचे! नाही का? रूम मधल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींचा पसारा आवरणे सोपे, त्यासाठी इतर कुणाची मदत घेणे देखील शक्य आहे. पण मनात नि मेंदूत असलेला अदृश्य, विस्कळीत नि असंबद्ध पसारा कसा आवरणार? त्यासाठी स्वतःलाच कधीतरी निश्चय पूर्वक पुढाकार घ्यावा लागणार. आणि हे जमले तर नक्कीच “विवेकानंदांना”अपेक्षीत असणारी अविरत शांतता आणि प्रसन्नता आपल्यालाही अनुभवता येईल.

बघुयात! जमतंय का मनातील पसारा आवरायला!!!

















-Until next time!

Gaurav ☺️

Comments

  1. मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून मनस्वी आनंद झाला . इंग्रजी शिकल्यानंतर जगासमोर आपण हुशार होतोच पण आत्मिक समाधान हे शेवटी मायबोलीतच असत . आज आपल्यातला आळशी मराठी लेखकाने खूप भारी पसारा आवरला 😀असो ,नेहमीप्रमाणे भारी !!

    ReplyDelete
    Replies
    1. 😄 मायबोली ती मायबोलीच, तुमच्या सारख्या कवीचे उद्गार हे आमच्या साठी प्रेरणादायी आहेत. 😄🙏🏼

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

MY COLLEGE JOURNEY

                   MY COLLEGE JOURNEY As I look back on the years gone by, I can’t be thankful enough for them. Professionally and personally, those are the best years I’ve had. Those college years (2016-2020) gaves me a lots of experiences, a lot of memories, a lots of life lessons, and so on. What did you learnt in those years? Can you describe it in one word? For me it is “GRATITUDE”. I discovered that having a deep sense of gratitude for all that you have in a life is a source of profound happiness. As I started my college for the first time in the month of August 2016. I was quiet afraid as I do not want to go the B.Pharm Degree course. But due to the some reasons I took a decision to go to the bachelors of pharmacy degree. From the very first day of my college admission to the till date the my journey of college was very interesting and distinct. On the 8th of July 2016 I took admission to the KVPS Institute of Pharmaceutic...

Journey of Master's: Lessons and Reflections

“Lao Tzu”, once rightly said, “The Journey of Thousand Miles Begins With a Single Step”   Today I’m at the stage of finishing my master's and heading towards a new phase of my life. I still remember the days when I’m in dilemma about choosing the next path of my career after my bachelor's. As my bachelor degree was nearing the finish, I was quite firm about doing my master as on a distance basis from the same institute. But due to the importunity of family members, I opted to go for the regular mode. I still remember the day when (30/1/2021) when I confirm my admission to the college and started my master’s college on regular basis from 5/2/2021 onwards.  Initially, the college was supposed to be on online mode due to the upsurge in COVID-19 cases. Up to June 2021, things are getting normal back. Due to COVID-19, the exam for the first two semesters of the first year was held in online mode (Sessional exams were offline mostly). As already our year has started quite late due t...

2025: A Year in a Nutshell

The time has come to say goodbye to 2025 and welcome 2026. This is the right time to look back at the year, think about what happened, and prepare for what is coming next. For the last two years, I have built a habit of reviewing my year and learning from it. This moment helps to remember what I did, what I missed, and what I still want to do. I truly believe this is the time to learn from the past and get ready for the future. Reflection is not only about success. It is also about emotions, mistakes, lessons, strength, and growth. So it is important to pause, think, and move ahead with better understanding. Like always, 2025 passed very fast. It feels like it just started and now it is ending. Every year teaches something. Sometimes it feels light and happy. Sometimes it feels heavy and difficult. But every year shapes us in some way. At the beginning of 2025, I had many resolutions. Some I completed, some I could not. That is completely fine. Life does not always follow our plans. Wh...