लोग भूल जाते है नाम....जब निकल जाता है काम.....
“कामा पुरता मामा , ताकापुरती आजी, जोवर पुरती हट्ट सर्व हे पत्नी असे राजी.” लहानपणी एकलेल्या ह्या ओळी आजच्या काळाचे वर्णन खूप योग्य आणि अचुक करताय. असे म्हणतात गरज ही काळाची जननी आहे, पण प्रत्यक्षात गरज फक्त क्षणिक मतलब आहे. मतलब जिथपर्यंत ओळख तिथपर्यंत. ह्या आभासी जगात सर्व काही ही गरजे पूर्त मर्यादित आहे इथर्यंत वाटायला लागतय.
आपण सारेच मतलबी बरं का? सारेच..
बालपणी शाळेत जायला सोबत होईल म्हणून कोणाशी तरी दोस्ती करणार, मग गृहपाठ सहज पुर्ण होईल म्हणून मैत्री करणार, खाऊला पैसे मिळनार म्हणून पाहुण्यांच्या पाया पडनार लहानपासुन आपणच आपल्यावर मतलबीपणाचा मुलामा चढवत राहिलो.
ती छान फ़ोटो काढते, ती सुंदर दिसते, तिच्यासोबत राहिल तर notes मिळायला बर होईल. तीचे Practical Records पुर्ण असतात म्हणून तिच्या मागे मागे फिरणारया कितीतरी असतात. तो चित्र फार सुंदर काढतो त्याच्यासोबत राहिलो तर आपल पण काम जमतंय, असे असंख्य मतलब-गरजा वेगवेगळ्या नात्यांच्या लेबलखाली आपल्या सभोवताली बघायला मिळतात.
एखादया व्यक्तीला आपण ह्या अश्या फसव्या दुनियेतसुद्धा मनापासुन आपल मानत आलेलो असतो, आणि तीच आपल माणुस मात्र दुसरच कोणीतरी असत तेव्हा मात्र गफलत होते. त्याची हरकत ही नाही परंतू त्याच्या/तिच्या सर्व गुण-दोषांसकट आपण जस स्वीकारलेल असत तस्स जेव्हा आपला स्विकार होत नाही.. तेव्हा विश्वास उडतो, अगदी त्या फुलपाखरांसारखा सैरा वैरा ओअलत राहत. पाना-फुलांवरुन दगडा कौलांवरुन फक्त भिरभिरत राहत ईवलुश्या पाखरावरती आभाळ बनून कोसळत ना अगदी तस्स कासाविस होत. पहिल्या पावसाचा पहिलाच थेंब अंगावर पडल्यावर अंग मोहरुन जाण्याएवजी एकटेपणाच्या भितीने मन शहारुण जात.
फुलाला पायदळी तुडवल्याच्या दु:खापेक्षा सुगंध व्यर्थ गेल्याच दु:ख जास्त असते हे तेव्हा कळते.
हवी असतात दोन आपली माणसं चार गोष्टी करायला, थोड्या गप्पा मारायला, थोड मनातलं सांगायला आणि निवांत काही क्षण विसावायला. थोड निर्व्याज प्रेम करणारी स्मित हास्य करत समजुण घेत समजाऊन सांगणारी माणसं हवी असतात. पण जिथे अपेक्षा तिथे विरह जिथे निराशा तिथ दु:ख.
माणसं तशी सगळीच चांगलीच बर का ?
आपल्याला वाईट बरं कोणी आवडेल का. पण आपल्या गरजा अपूर्ण राहता जेव्हा तिसर कोणी पुर्ण संपुर्ण करणार येत. खर तर कोणीच कोणाच्या मधे नसत आलेल, मधे येतात त्या आपल्या गरजा, अपेक्षा, भावना, आणि बरच काही अव्यक्त.
Facebook वर 5k friend असणार्यांचे ख-या आयुष्यात किती मित्र असतात हा एक वेगळा विषय होऊ शकेल तुर्तास त्यावर चर्चा नकोच.
तो माझ्याशी बोलत नाही मग मी त्याच्याशी स्वत:हून का बोलाव?
ती माझ्याबद्दल अमुक-ढ़मूक बोलली अस करत करत आपण कधी आपल्या मानसात गैरसमजाचे धूरे बांधून घेतलेत हे आपल्याला कळत सुद्धा नाही.
Follow लाच Followback, like ला like, comment ला comment मिळवणा-या मतलबी जगाचं दुसर काय होणार. यात वेगळं सांगण्याची काही गरज वाटत नाही.
मतलब नसावा ह्या विषयावर लिहताना सुद्धा मतलब मधे मधे डोकावत आहेच.. गरज प्रत्येकाला असतेच, ती असावी सुद्धा पण मग तिला मतलबीपणाची किनार नसावी.थोडी निस्वार्थ, थोडी निर्व्याज, थोडी मुबलक थोडी हळूवार साथ देऊया. अपेक्षा न करता, दुखवूण न घेता एक फुंकर मारूया. थोडी ढिल देऊन बघुया आणि मग बघा आपल्या आयुष्याचा पतंग कसा सारा आसमंत आनंदी चे डोहि तरंग घेतो.
गरज असताना केलेली मदत ही फार काळ आनंद देणारी असते गरज घेतलेला भलेही ती गोष्ट विसरून जावो पण देणारा तो देव कधीही विसरत नसतो. त्यामुळे कधीही कोणाला काही द्यावेसे वाटले तर मन कधीही मागे पुढे पाहत नाही. नाही कधी त्या मदतीत काही स्वार्थ दडलेला असतो, असते ते फक्त निस्वार्थ भावना, आपण केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची एक संधी, आणि त्याहून अधिक म्हणजे माणूस बनण्याची संधी
आपण सर्वच आपापल्या आयुष्यात खुप व्यस्त असलो तरी थोड काळ सोखावू नये ह्यासाठी थोडे प्रयत्न नक्कीच करतो आणि करु शकतो.
कोणीतरी आपल्याला मनोमन आपल बघतय ह्याची जाणिव ठेवुया, मग ते कोणीही असूद्या आपली भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिण, प्रेयसी-प्रियकर किंवा अन्य कोणीही, आपल्याला गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची, आपल्या आयुष्यातले थोडे क्षण त्यांच्यासोबतसुद्धा वाटुन घेण्याची.
गरज आहेच आपल्याला… आपल्या आपलेपणाची…आपल्या लोकांची आणि #आपुलकीच्या दोन गोड शब्दांची...
![]() |
| Today's best read! Made my day |
Quote
किन राहों से सफ़र है आसाँ कौन सा रस्ता मुश्किल है
हम भी जब थक कर बैठेंगे औरों को समझाएँगे
#निदा_फ़ाज़ली
Until next time!
Gaurav😊!

Comments
Post a Comment