अंत आणि सुरुवात ह्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात, ज्यावेळी संघर्ष रक्तातून पुढच्या पिढीला सुपूर्द होतो....
अगदी लहानपणा पासून तर थेट महाविद्यलया पर्यन्त च्या प्रवसात अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न मनःजे तुमचा प्रेरणास्तान किवा आवडते व्यक्तिमहत्व कोणते...हां मला ही अनेक वेळा विचारला गेलेला आणि विचारलेला जाइल असा प्रश्न. असा प्रश्न कोणीही उपस्थित केल्यास माझ्या डोळ्यासमोर अनेक नाव उभी राहतात पन त्या सर्वामधे जर कोणते नाव हे अग्रस्थानी व पहिले असेल तर ते मनःजे
"छत्रपति संभाजी महाराज."
हे फक्त नाव नाही तर सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या जडनघड़नीचे एक ज्वलंत उदाहरण आहे. प्रेरणानास्थान मनःजे नेमके काय या प्रश्नाचा अर्थ नीट समजून घेतल्यास मला या प्रश्नाचे उत्तर हे संभाजी महाराज देण्यास गर्व वाटतो. वय वर्ष अवघ 32 असताना स्वराज्या साठि आपल्या प्राणांची आहुति देणारा हां इतिहासातला पहिलाच राजा आहे. संभाजी महाराजकड़ूनं शिकन्या सारख्या असंख्य गोष्टी आहेत. अखंड हिन्दुस्तानामधे जर बुद्धिमान आणि प्रचण्ड बलवान असा कोणी राजा असेल तर तो मनःजे छत्रपति संभाजी महाराज. कारण अशे खुप कमी राजे होते ज्याना हे समीकरण अवगत होते .
इतिहासाच्या पानांत सुवर्ण अक्षराने कोरलेल नाव मनःजे संभाजी महाराज. अवघ्या 14 वर्षाच्या वया मधे 16 भाषावार प्रभुत्व असणारे महाराज हे एकमेव राजे इतिहासात होउन गेलेत. वय वर्ष अवघ 14 असताना संस्कृत भाषेत बुद्धभूष्णम नावाचा ग्रंथ महाराजांनी लिहून ठेवला. बुद्धि आणि बळ याचे अचूक समीकरण संभाजी महाराज होते. आपल्या उभ्या 32 वर्ष्याचा आयुष्यात 120 हून अधीक लढाया करूण त्यातून एकही न हरता जिंकनकारा अजिंक्य योद्धा मनःजे शूर आबांचा शूर छावा संभाजी महाराज होय. हतिहासत अजिंक्य मनुन मान मिळवनारे पहिले राजा मनुन संभाजी महाराजांची ख्याति आजही आहे. इतिहासात सिंहा समोर जाणारे अनेक होते पन सिंहाचा जबडा फाड़नारा अजिंक्य योद्धा हां एकच होता. अशे एक ना अनेक पराक्रम आपल्या नावावर असणारा हां राजा आजही इतिहासात अजरामर आहे.
शिवसूर्य अस्ताला गेल्यानंतर पुढील संकटपरंपरेच्या तमोयुगाची ललकारी ऐकू येऊ लागली आणि आता स्वराज्याला खग्रास ग्रहण लागते की काय अशी भीती निर्माण झाली.परंतू या प्रसंगी ही, राष्ट्रभक्ती ,स्वामिनिष्ठ व शौर्य या गुणांच्या शुक्रताऱ्याचे तेज हळुहळु प्रकट होऊ लागले व मराठ्यांची अस्मिता कडाडली आणि स्वराज्याच्या युवराजाने आशिया खंडातील सर्वात शक्तीशाली मुघल सत्तेचा बादशहा औरंगजेब सोबत युद्धाचे रणशिंग फुकले...पुरंदर, राजगड वरती दूमदूमनारी ही छोटीशी पावलं या मुघलांचा कर्दनकाळ होऊन बसली...इंग्रज ,फ्रेंच,पोर्तुगीज,सिद्दी ,मोघल यांच्या छाताडावर या स्वराज्याचं निशाण रोवल. आज ३००च्यावर वर्षें झाली, हा राजा आम्हाला अजून स्फुर्ती आणि ताकद देतो...तो मनःजे संभाजी महाराज.
इतिहास आपल्या हातात नसतो, पण वर्तमान घडवणे आपल्या हातात असते. आपल्या पहाडाएव्हढ्या महान पित्याला ऐन तारुण्यात गमावल्यावर कुठेही ध्यासाचा बुरुज ढासळू न देता चहुबाजूंनी कोसळणाऱ्या एकापेक्षा एक भयानक संकटांवर त्यांच्यावर दुप्पट आवेशाने तुटून पडलेला वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत भारतातले मातब्बर हुकूमशहा अक्षरशः आपल्या घोड्याच्या टाचेखाली तुडवले. तीन शातकाहून जास्त काळ परकीयांनी ग्रासलेल्या भूमीत आपल्या पराक्रमाचा घोडा थयथया नाचवला. हिंदुस्थानच्या बादशहाचे शीर भुंडे केले. महाराजांचे नाव सर्वथा सार्थ केले. घरभेद्यांविरुध्द यशस्वी झुंज देणार्या रणमार्तंड योध्द्याचा धगधगता आयुष्यपट म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे.
एखाद्या पर्वताप्रमाणे महान असलेल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेऊन तब्बल ९ वर्षे स्वातंत्र्यासाठी निकराची पंजेफाड केली आणि औरंगजेबाला ह्याच दख्खनेत आपल्या कबरीसाठी जमिन शोधावयास भाग पाडण्याचे धैर्य मराठ्यांना दिले तोच सामर्थ्यशाली महाबलाढ्य नेता म्हणजे छत्रपती संभाजीराजे....
अवघ्या तेविशीची उमर...
पित्याची मनीषा पूर्ण करण्याची जिद्द ...
युद्धाचा ४० वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या कसलेल्या सेनापतीशी निकराची झुंज ...
एक नाही दोन नाही तब्बल ५-५ युद्धभीमवर आघाड्या,
प्रत्येक मुख्य लढाईत सेनापतित्व ...
आपल्या वयाच्या दुपटीने मोठ्या असलेल्या योद्धयांना धूळ चारली ...
अवघ्या हिंदुस्थानच्या पातशहाने,औरंगजेबाने चिडून राजमुकुट जमिनीवर फेकून दिला ...
समुद्रावर शतकाहून अधिक वर्षे अफाट सत्ता गाजवणाऱ्या पोर्तुगीजांना ह्या योध्याच्या भीतीने अक्षरशः आपली राजधानी हलवली, सैन्य लढायला पुरेना म्हणून कैदखान्यातले कैदी लढायला बाहेर काढले !
*परिस्थिती कितीही विपरीत असली आणि गनीम कितीही चालाख असला तरी देखील न डगमगता लढाईचे नियोजन, आक्रमकता, समयतत्परता, शास्त्रज्ञान, नेतृत्वगुण, शौर्य या आणि अश्या असंख्य गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकन्यासारख्या आहेत.....महाप्रलयातून तरलेले एक कमल पुष्प...मनःजे संभाजी महाराज.
एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज..!
💫संघर्षमय आयुष्यात देखील स्वतःच्या तत्वावर जगायला शिकवणारे जगातील एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजेच....⚡
*💫स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज✨*
_*छत्रपती शंभूराजेंचे शेवटचे काही शब्द…*_ जे आजही आणि उद्याही प्रेरणा देत राहतील....
_*"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पहात असाल मला, पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो.*_
_*आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, "आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु".*_
_*तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत आता.*_
*अन् तुम्हाला "आबासाहेब, अशी साद घालायला जीभही उरली नाही हो.*
_*पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल, आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, हजार वेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे…*
*जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत आणि मरायच कसं हे मी शिकवेन...*
*चाळीस दिवस मरण यातना*
*सहन करुन ताट मानेने जगणारा*
*माझा शंभूराजा तर साक्षात देवच होता..🚩*
*|| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ||*
माहिती संकलन
छावा-शिवाजी सावंत आणि ट्विटर🙏
🙏🙏🙏


Super bHai
ReplyDeleteअप्रतिम !! जय जिजाऊ , जय शिवराय 🙏
ReplyDelete🚩🧡🔥
ReplyDelete